Share Market : SVB संकटामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 दिवसांत 9.5 लाख कोटी पाण्यात, नेमक काय झालं?

सलग चार दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे
Share Market
Share MarketSakal

Share Market : काल म्हणजेच 14 मार्चला सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली. सलग चार दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बाजारातून साफ ​​झाले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून दलाल स्ट्रीटवर चौफेर लाल खुणा दिसत आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटानंतर आणखी एक बँक सिग्नेचर बँकही ठप्प झाली आहे. भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान किती झाले?

बाजारातील घसरणीचा कल 9 मार्चपासून सुरू असून काल म्हणजेच 14 मार्चला सलग चौथ्या दिवशी घसरणीचा मोठा धक्का गुंतवणूकदारांना बसला. (indian stock market lost 9.56 lakh crore rupees in just four trading sessions due to Silicon Valley Bank crisis)

अवघ्या 4 दिवसांत भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांचे 9.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा मोठा आकडा असून गुंतवणूकदारांच्या खिशातून 9.5 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

BSE च्या बाजार भांडवलात मोठी घसरण :

सलग चार दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 9.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर बीएसईचे बाजार भांडवल 256.59 लाख कोटी रुपयांवर आले आहे. 8 मार्च रोजी ते 266.24 लाख कोटी रुपये होते.

मंगळवारी शेअर बाजारात बीएसईच्या बाजार भांडवलात 1.96 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. चालू आठवड्यात दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 6.35 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Share Market
LIC Policy : एकदाच करा गुंतवणूक आणि मिळवा दहापट परतावा

मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली :

गेल्या चार व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स सुमारे 2,400 अंकांनी घसरला आहे. कालच्या व्यवहारात सेन्सेक्स 338 अंकांनी घसरून 57,900 वर आला.

निफ्टीमध्येही कालचा व्यवहार 111 अंकांच्या घसरणीसह 17,043 पातळीवर बंद झाला. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक मंगळवारी त्यांच्या 200 दिवसांच्या सरासरीच्या खाली व्यवहार करत होते.

सिलिकॉन व्हॅली बँकेचे संकट आता इतर बँकांवरही येऊ शकते. अमेरिकेसह जगभरातील अनेक स्टार्टअप्सना त्याची झळ जाणवू लागली आहे.

दरम्यान, लेहमन ब्रदर्सच्या प्रकरणानंतर संपूर्ण बँकिंग जग हादरले असताना 2008 च्या संकटाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स फंड तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

Share Market
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com