
Infosys Mega Buyback
Sakal
इन्फोसिसने 10 कोटी शेअर्स परत विकत घेण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
प्रति शेअर 1,800 रुपयांच्या दराने होणाऱ्या या बायबॅकमध्ये गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांचा प्रीमियम मिळेल.
हा आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा बायबॅक आहे.
Infosys Mega Buyback: आयटी कंपनी इन्फोसिसने मोठा निर्णय घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कंपनीने जाहीर केले की, ते 10 कोटी शेअर्स बायबॅक करणार आहेत. हे शेअर्स प्रति शेअर 1,800 रुपयांच्या दराने विकत घेतले जातील. या प्रक्रियेत कंपनी तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च करणार असून गुंतवणूकदारांना सुमारे 19 टक्के प्रीमियम मिळणार आहे. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांना सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 19 टक्के प्रीमियम मिळणार आहे.