

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय शेअर बाजार तेजीत राहिला आणि निफ्टी 25,400 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. त्यामुळे एफएमसीजी वगळता सर्वच क्षेत्रात खरेदी झाली. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 97.84 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी वाढून 82,988.78 वर बंद झाला आणि निफ्टी 27.30 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी वाढून 25,383.80 वर बंद झाला.