Invest In USA Stock
sakal
Investment In Apple And Amazon Stock : भारतीय गुंतवणूकदारांचा परदेशातील शेअर बाजारांमधील ओढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या अवघ्या १० महिन्यांत भारतीयांनी परदेशात तब्बल १.९६ अब्ज डॉलर्स, म्हणजेच १७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ही गुंतवणूक १.२७ अब्ज डॉलर्स इतकी होती.