Share Market Today: शेअर बाजारात खरेदी होणार? 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: मंगळवारी शेवटच्या तासांमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय बाजाराने दिवसातील बहुतांश नफा गमावला. तरीही बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात किरकोळ वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 89.83 अंकांच्या अर्थात 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 73,738.45 वर बंद झाला
Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Investment Tips in marathi Which 10 shares perform today Sakal

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी शेवटच्या तासांमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय बाजाराने दिवसातील बहुतांश नफा गमावला. तरीही बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात किरकोळ वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 89.83 अंकांच्या अर्थात 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 73,738.45 वर बंद झाला आणि निफ्टी 31.60 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 22,368 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

रेंज बाउंड ट्रेड 31.60 अंकांच्या वाढीसह 22,368 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. सेक्टरल इंडेक्समध्ये, रियल्टी 2.6 टक्क्यांहून अधिक वाढला आणि दिवसातील सर्वाधिक वाढ झाली. यानंतर एफएमसीजी आणि मीडियामध्ये वाढ दिसून आली.

दुसरीकडे, सर्वात मोठी घसरण फार्मामध्ये (0.90 टक्के) झाली. मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये अधिक अॅक्शन दिसून आली. मिड आणि स्मॉल कॅप 1 टक्क्यांहून अधिक वाढले आणि फ्रंटलाइन इंडेक्सला मागे टाकले.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Bank Disinvestment: मोदी सरकार 'या' 5 सरकारी बँकांमधील हिस्सा विकण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

निफ्टीला 22,430-22,500 च्या बियरिश गॅप झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागला आहे. अपट्रेंड वाढवण्यासाठी हा गॅप झोन भरणे आवश्यक आहे, तर डाउनसाइडवर 22,190 (50 DMA) पातळी सपोर्ट म्हणून राहील.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ग्रासिम (GRASIM)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • मारुती (MARUTI)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • आयडीया (IDEA)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Loksabha Election: लोकसभा निवडणुकी दरम्यान ऑनलाइन पेमेंटवरही आरबीआयची नजर; मार्गदर्शक सूचना जारी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com