Share Market Today: अस्थिर शेअर बाजारात आज कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 89.64 अंकांच्या अर्थात 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 72,101.69 वर बंद झाला
Investment Tips in marathi Which 10 shares perform today MARUTI NESTLEIND POLYCAB 21 March 2024
Investment Tips in marathi Which 10 shares perform today MARUTI NESTLEIND POLYCAB 21 March 2024 Sakal

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 89.64 अंकांच्या अर्थात 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 72,101.69 वर बंद झाला आणि निफ्टी 21.60 अंकांच्या म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 21,839.10 वर बंद झाला. निफ्टी बँक 74 अंकांनी घसरून 46311 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप इंडेक्स 6 अंकांनी घसरला आणि 45,920 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टीला बुधवारी आणखी एका अस्थिरतेचा सामना करावा लागल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी बुल्स आणि बेअर्स यांच्यातील संघर्ष सुरूच होता. आता 46000-45800 च्या झोनमध्ये बँक निफ्टीला सपोर्ट आहे.

जोपर्यंत हा सपोर्ट कायम आहे, तोपर्यंत तेजीची आशाही कायम राहील. वरच्या बाजूस, 47000 किंवा 20 DMA च्या आसपास रझिस्टंस दिसतो. हा रझिस्टंस पार केल्यास, बँक निफ्टी 48000-48500 च्या दिशेने जाताना दिसू शकेल.

आवर्ली टाइम फ्रेमवर दिसणारा मोमेंटम सेटअप विक्रीचा दबाव कमी होण्याची चिन्हे दाखवत आहे. पॉझिटिव्ह डायव्हर्जंससह, एक पॉझिटिव्ह क्रॉसओव्हरही सध्या होत आहे. प्राइस पॅटर्नच्या दृष्टिकोनातून, डेली कँडलस्टिकने डोजी पॅटर्नचे रूप धारण केले आहे, जे बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे लक्षण आहे.

बुल्स आणि बेअर्स दोघेही सध्या आपापल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. अशा परिस्थितीत, मार्केटमध्ये आणखी कंसोलिडेशन दिसू शकते ज्याची रेंज 21700 - 22000 असू शकते.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today MARUTI NESTLEIND POLYCAB 21 March 2024
Income Tax: ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठ नुकसान

बँक निफ्टी सलग नवव्या ट्रेडिंग सत्रात तोट्यासह बंद झाला. या घसरणीला रायझिंग चॅनलच्या खालच्या टोकाला सपोर्ट मिळाला आहे. डेली लोअर बोलिंजर बँड 45800 च्या आसपास दिसतो.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये एक पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर आहे जे एक पॉझिटिव्ह संकेत आहे. अशा परिस्थितीत, पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये 46800 - 46950 पर्यंत रिकव्हरीची आशा दिसत असल्याचे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • मारुती (MARUTI)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today MARUTI NESTLEIND POLYCAB 21 March 2024
Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल! 50 पैशांचा स्टॉक तीन वर्षांत 50 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com