Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल! 50 पैशांचा स्टॉक तीन वर्षांत 50 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारात सध्या खूप चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत. पण बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion topline
Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion toplineSakal
Updated on

Multibagger Stock: शेअर बाजारात सध्या खूप चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत. पण बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

यामध्ये गुजरात टूलरूमचाही (Gujarat Toolroom) समावेश आहे. सध्या स्टॉकमध्ये काही प्रमाणात अस्थिरता आहे, पण गेल्या तीन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. (Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion topline)

गुजरात टूलरूमचा शेअर सध्या 48 रुपयांच्या आसपास आहे. एक काळ होता जेव्हा शेअरची किंमत 1 रुपयापेक्षा कमी होती. 19 एप्रिल 2021 रोजी शेअरची किंमत 0.48 रुपये होती. त्यानंतर हा स्टॉक हळूहळू वाढला. ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान शेअरची किंमत 12 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत वाढली.

यासोबतच, गेल्या तीन वर्षांत शेअर 50 पैशांपासून ते 50 रुपयांपर्यंत वाढला. तीन वर्षांत, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 8774.54% परतावा दिला आहे. शेअरची 52 आठवड्यांचा नीचांक 8.92 रुपये आहे आणि उच्चांक 62.97 रुपये आहे.

Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion topline
Income Tax: ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठ नुकसान

अलीकडे, गुजरात टूलरूम लिमिटेडची (GTL) दुबई उपकंपनी, जीटीएल जेम्स डीएमसीसी, आर्थिक आणि व्यवसाय विस्तारासह उदयास आली आहे. कंपनीने 202 कोटींची उलाढाल आणि 27 कोटींचा नफा गाठला आहे. कंपनी हिरे आणि रत्नांच्या व्यापारात माहिर आहे आणि मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत तिची मजबूत पकड आहे.

या व्यतिरिक्त, जीटीएल जेम्स डीएमसीसीने उत्कृष्ट नफा कमावला आहे. उद्योगातील स्पर्धकांना सुमारे 4% मार्जिन राखण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, जीटीएल जेम्स डीएमसीसीने सातत्याने 13.74% चा नफा मिळवला आहे.

Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion topline
RBI Bulletin: अर्थव्यवस्था, महागाई अन् व्याजदराबाबत RBIचा अहवाल प्रसिद्ध; यात नेमक आहे तरी काय?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Multibagger Stock Gujarat Toolroom dubai subsidiary achieves 2 billion topline
Share Market Holiday: पुढील 11 दिवसांत 6 दिवस शेअर बाजार राहणार बंद; BSE-NSEने दिली माहिती, काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com