Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत? कशी असेल बाजाराची स्थिती?

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क इंडेक्स 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले. 72,222.29 या इंट्राडे नीचांकी स्तरावर पोहोचल्यानंतर सेन्सेक्स सावरला.
Share Market Today
Share Market TodaySakal

Share Market Investment Tips In Marathi: बुधवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क इंडेक्स 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले. 72,222.29 या इंट्राडे नीचांकी स्तरावर पोहोचल्यानंतर सेन्सेक्स सावरला.

व्यवहाराच्या शेवटी तो 790.34 अंकांनी अर्थात 1.08 टक्क्यांनी घसरून 72,304.88 वर बंद झाला. निफ्टी मागील बंदच्या तुलनेत 247.10 अंकांनी म्हणजेच 1.11 टक्क्यांनी घसरून 21,951.20 वर बंद झाला. निफ्टी इंट्राडे मध्ये 21,918.85 च्या पातळीवर घसरला होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारच्या सत्रात बेअर्सचे वर्चस्व असल्याने बाजारात घसरण दिसून आली. ट्रेडिंग सत्राच्या उत्तरार्धात विक्रीचा दबाव वाढला आणि निफ्टी 22,000 अंकांच्या खाली गेला.

तो शेवटी 247.20 अंकांच्या घसरणीसह 21,951.15 वर बंद झाला. बियरिश इंगल्फिंग कँडलस्टिक पॅटर्नसह, निफ्टी 50 इंडेक्सने अखेरीस डाउनसाईड कंजेशन झोन तोडला आहे जो शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीत कमकुवतपणा दर्शवतो. आता निफ्टीला तात्काळ सपोर्ट 21,820 वर दिसत आहे तर वरच्या बाजूला 22,100 वर रझिस्टंस आहे.

Share Market Today
Nita Ambani: मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचे नेतृत्व करणार नीता अंबानी? मिळू शकते मोठी जबाबदारी

दिवसभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने निफ्टीमध्ये करेक्शन झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. इंडेक्स 22,000 अंकांच्या खाली घसरला असून वाढत्या कमकुवतपणाचे संकेत आहेत.

जर निफ्टी 21,950 च्या खाली गेला तर घसरण वाढेल आणि ती 21,800 पर्यंत करेक्ट होऊ शकेल. याउलट, निफ्टी 21,950 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर तो 22,100 ची पातळी पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • ए यू बँक (AUBANK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

Share Market Today
Anil Ambani: अनिल अंबानींची मोठी कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर; का आली ही वेळ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com