Share Market Today: शेअर बाजारातील विक्रीच्या काळात कोणते शेअर्स असतील तेजीत? काय तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: जानेवारी सीरीज एक्स्पायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी बाजारात कमजोरी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 360 अंकांनी घसरुन 70,701 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: जानेवारी सीरीज एक्स्पायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी बाजारात कमजोरी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 360 अंकांनी घसरुन 70,701 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 101 अंकांनी घसरून 21,353 वर बंद झाला. बँक निफ्टी 216 अंकांनी घसरून 44,866 वर बंद झाला. मिडकॅप 215 अंकांनी घसरून 47,209 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अर्थसंकल्पापूर्वी नकारात्मक ट्रेंडसह बाजारात बरीच अस्थिरता दिसून आल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे यांनी सांगितले. गुंतवणूकदारांनी एक्सपायरी दिवशी नफा बुक केला.

देशांतर्गत इक्विटी मार्केटमधून सतत परदेशी निधी काढून घेतल्याने गेल्या आठवडाभरापासून सेंटिमेंटवर नकारात्मक परिणाम झाला आहे. एफआयआयने जानेवारीमध्ये आतापर्यंत 33,000 कोटीहून अधिकची विक्री केली आहे.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीसाठी 21,400 वर रझिस्टंस दिसून येत आहे. कमजोरीचे संकेत पाहता, निफ्टी अखेरीस 21,100 आणि 21,000 पर्यंत खाली जाऊ शकतो, असे दिसते. जर त्याने 21000 ची पातळी मोडली तर आपण 20900-20500 च्या पातळीपर्यंत घसरण पाहू शकतो. सध्याच्या ट्रेंडमध्ये कोणताही बदल तेव्हाच होईल जेव्हा निफ्टी 21,500 चा टप्पा पार करेल.

Share Market Today
Mutual Fund : उसळत्या बाजारात, ओळखा पुढची बात!

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • सिप्ला (CIPLA)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • एलटी माइंड ट्री लिमिटेड (LTIM)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • कोफोर्ज (COFORGE)

Share Market Today
Stock Split : स्टॉक स्प्लिट’ म्हणजे काय ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com