Share Market Today: चांगल्या कमाईसाठी इंट्राडे यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips (Top Shares): गुरुवारी निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. गुरुवारी बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मिडकॅप इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
Share Market today
Investment Tips Sakal
Updated on

Share Market Investment Tips: गुरुवारी निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. गुरुवारी बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मिडकॅप इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. रियल्टी, पीएसई आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. इन्फ्रा, एनर्जी आणि मेटल इंडेक्सही वाढीने बंद झाले. त्याच वेळी, एफएमसीजी आणि फार्मा इंडेक्सवर दबाव दिसून आला.

सेन्सेक्स 692 अंकांनी वाढून 75,075 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 201 अंकांनी वाढून 22,821 च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी 237 अंकांनी वाढून 49,292 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप 1147 अंकांनी वाढून 52,414 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीला 22,500 वर त्वरित सपोर्ट दिसत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे रिसर्च एनालिस्ट देवेन मेहता म्हणाले. त्यानंतर पुढील मोठा सपोर्ट 22400 आणि 22,200 वर आहेत. त्याच वेळी, वरच्या बाजूला, 22,750 वर रझिस्टंस दिसू शकतो, तर त्यानंतर पुढील मोठा रझिस्टंस 22,800 आणि 22,900 वर दिसत असल्याचे ते म्हणाले.

निफ्टीने गुरुवारी स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. हा पॅटर्न बुल्स आणि बेअर्स यांच्यातील अनिश्चिततेची स्थिती म्हणून पाहिला जातो. आता निफ्टीला 22485 च्या स्तरावर सपोर्ट दिसत आहे आणि 23,080-23,130 च्या स्तरावर रझिस्टंस आहे.

Share Market today
RBI MPC: निवडणूक निकालानंतर RBIची पहिली बैठक; EMI वर उद्या होणार निर्णय

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • श्रीराम फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

Share Market today
Veg Thali Price: शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com