Jash Engineering : वर्षभरात 113% रिटर्न देणारा हा शेअर आणखी वाढणार ; तज्ज्ञांचा विश्वास

शेअर बाजारात सध्या चांगलीच अस्थिरता दिसून येत आहे, अशा वातावरणात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याबाबत बरेच गुंतणुकदार संभ्रमात असतात. अशावेळी चुकीच्या शेअर्समधील गुंतवणूक तुम्हाला मोठं नुकसान करु शकते.
Jash Enginnering Corporation
Jash Enginnering Corporation sakal

शेअर बाजारात सध्या चांगलीच अस्थिरता दिसून येत आहे, अशा वातावरणात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याबाबत बरेच गुंतणुकदार संभ्रमात असतात. अशावेळी चुकीच्या शेअर्समधील गुंतवणूक तुम्हाला मोठं नुकसान करु शकते. त्यामुळेच तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. अशात मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. ज्यात लाँग किंवा शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवता येऊ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही कालावधीत हा शेअर तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतो.

मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी जश इंजिनिअरिंगची (Jash Engineering) निवड केली आहे. त्यांनी पहिल्यांदाच या शेअरवर बाय रेटींग दिल्याची माहितीही जैन यांनी दिली. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये अचानक खूप गुंतवणूक करू नये आणि हळूहळू खरेदी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. जश इंजिनिअरिंग (Jash Engineering) सीएमपी (CMP) - 1850 रुपये टारगेट प्राइस (Target Price) - 2050 रुपये.

जश इंजिनिअरिंग ही कंपनी 1971 पासून कार्यरत आहे. कंपनीचा बराचशी वॉल्यूम परदेशातून येते. ही कंपनी सांडपाण्याशी अर्थात वेस्ट वॉटरसंबंधित उपायांवर काम करते. हे सेगमेंट खूप मजबूत आहे आणि चांगल्या परताव्यासाठी इथे खरेदी करता येईल असे ते म्हणाले.

कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी सुमारे 24 टक्के आहे. याशिवाय कंपनीवर 78 कोटीचे कर्ज आहे. पण कंपनीमध्ये सतत वाढ होत आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये वाढ झाली आहे. तुम्ही हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शॉर्ट के लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून समाविष्ट करू शकता असा सल्ला जैन यांनी दिला आहे.

Jash Enginnering Corporation
Suzlon Energy Share : सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये दमदार ऍक्शन

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com