Jio Financial BlackRock Advisors JVSakal
Share Market
Jio Financial: शेअर बाजाराचे जग बदलणार; अंबानींनी अमेरिकन कंपनी सोबत केला मोठा करार
Jio Financial BlackRock Advisors JV: मुकेश अंबानी यांची वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता वित्त सल्लागार सेवा पुरवणार आहे. यासाठी अंबानींच्या कंपनीने ब्लॅकरॉक ॲडव्हायझर्स सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.
Jio Financial BlackRock Advisors JV: मुकेश अंबानी यांची वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता वित्त सल्लागार सेवा पुरवणार आहे. यासाठी अंबानींच्या कंपनीने ब्लॅकरॉक ॲडव्हायझर्स सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. JV चे नाव जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.
मुकेश अंबानी यांची वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस वित्त सल्लागार सेवा पुरवणार असल्याने शेअर बाजाराचे आणि ब्रोकर्सचे मार्केट बदलणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी या क्षेत्रात कोणते निर्णय घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदा होणार असल्याचे शेअर बाजारातीत विश्लेषकांचे मत आहे.