LICचा अजब निर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक, विकत घेतला 6.66 टक्के हिस्सा

LIC Stake in JSFL: एलआयसीने सेबीला माहिती दिली
LIC mukesh ambani
LIC mukesh ambaniSakal

LIC Stake in JSFL: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने जाहीर केले आहे की त्यांनी Jio Financial Services मधील 6.660 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने कालच स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याची लिस्टिंंग BSE आणि NSE वर झाली आहे.

एलआयसीने सेबीला माहिती दिली

LIC ने माहिती दिली की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 4.68 टक्के शेअर्सच्या डिमर्जरच्या बदल्यात मिळालेली रक्कम नॉन-बँकिंग वित्तीय संस्था जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अधिग्रहणासाठी वापरली गेली आहे.

19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बाजार नियामक सेबीला एलआयसीने याबाबत माहिती दिली असून आज त्यांचे अधिकृत पत्रही समोर आले आहे.

LIC mukesh ambani
Biggest IPO in 2023: सॉफ्ट बँक आणणार या वर्षीचा सर्वात मोठा IPO, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी लोअर सर्किटवर

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये काल लिस्ट झाल्यापासून आज दुसऱ्या दिवशीही लोअर सर्किट लागले आहे. आज, JIOFIN शेअर्स NSE वर रु. 12.45 किंवा 5 टक्क्यांनी कमी होऊन रु. 236.45 वर व्यवहार करत आहेत. बीएसईवर रु. 12.55 किंवा 4.99 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह रु. 239.20 वर व्यवहार करत आहेत.

LIC mukesh ambani
Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सावधान, ही छोटीशी चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

एलआयसीचे शेअर्स तेजीत

एलआयसीचे शेअर्स आज एक टक्‍क्‍यांहून अधिक तेजीत आहेत. दुपारी 1.30 च्या सुमारास एलआयसीचा शेअर 11.60 रुपयांनी किंवा 1.78 टक्क्यांनी वाढून 663.75 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com