Motisons Jewellers IPO : मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ लवकरच, सेबीकडे पेपर्स दाखल...

कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये सेबीकडे आयपीओ पेपर्स दाखल केले होते.
Motisons Jewellers IPO
Motisons Jewellers IPO sakal

जयपूरची रिटेल ज्वेलरी कंपनी मोतीसन्स ज्वेलर्स (Motisons Jewellers) आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने पुन्हा एकदा बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले आहेत. या आयपीओअंतर्गत 3.34 कोटी इक्विटी शेअर्सचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील.

त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही. मोतीसन्स ज्वेलर्सने आधीच आयपीओसाठी अर्ज केला आहे. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये सेबीकडे आयपीओ पेपर्स दाखल केले होते. मात्र, बाजार नियामकाने डिसेंबरमध्ये ड्राफ्ट पेपर कंपनीला परत केली होती. (Motisons Jewellers IPO coming soon share market news )

कंपनी आयपीओतून मिळालेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी (58 कोटी रुपये) वापरणार आहे. याव्यतिरिक्त, निधीचा वापर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी (71 कोटी) आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.

कंपनी 60 लाख इक्विटी शेअर्सच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते. जर कंपनीने प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे निधी उभारला, तर त्यानुसारफ्रेश इश्यूची साईज कमी होईल.

Motisons Jewellers IPO
Equity Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक आवश्यक

मोतीसन्स ज्वेलर्स दोन दशकांहून अधिक काळ दागिन्यांच्या उद्योगात आहे. कंपनीचे मॅनेजमेंट उद्योजक संदीप छाबरा पाहतात. ते कंपनीचे चेअरमेन आणि डायरेक्टर आहेत. याशिवाय कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय छाबरा आहेत. कंपनीचे सध्या जयपूरमध्ये चार शोरूम नेटवर्क आहे.

मोतीसन्स ज्वेलर्सने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 14.7 कोटी रुपयांचा नफा कमावला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 52.5 टक्क्यांनी अधिक आहे. याच कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल 47.5 टक्क्यांनी वाढून 314.3 कोटी रुपये झाला आहे. दागिन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा महसूल वाढला आहे.

Motisons Jewellers IPO
IPO News : ग्लोबल सरफेसचा आयपीओ आजपासून खुला, किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com