
Adani Power Stock Split
Sakal
अदानी पॉवरने आपले शेअर्स 1:5 रेशोमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक 10 रुपयांच्या शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपये होईल.
या बदलामुळे लहान व रिटेल गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करणे सोपे होणार आहे.
मार्केट कॅपमध्ये कोणताही बदल न होता फक्त शेअर्सची संख्या वाढेल.
Adani Power Stock Split: अदानी ग्रुपची वीज क्षेत्रातील कंपनी अदानी पॉवर (Adani Power) आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी मोठे गिफ्ट देत आहे. थर्मल आणि सोलर प्लांटद्वारे वीज उत्पादन करणाऱ्या या कंपनीने स्टॉक स्प्लिट (Stock Split) करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बोर्डाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असून प्रत्येक 1 शेअर पाच शेअर्समध्ये विभागला जाणार आहे.