Multibagger Stocks: 8 रुपयांच्या शेअरने बनवले कोट्यधीश, पण आता तज्ज्ञांचा शेअर्स विकण्याचा सल्ला, काय आहे कारण?

Multibagger Penny Stocks: गेल्या आठवड्यात या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला होता.
Multibagger Stock Update
Multibagger Stock UpdateSakal

Multibagger Penny Stocks: कार्बोरंडम युनिव्हर्सलच्या (Carborundum Universal) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच दमदार नफा मिळवून दिला आहे. मागच्या 20 वर्षात केवळ 69 हजारांच्या गुंतवणुकीवर त्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

गेल्या आठवड्यात तर या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. पण सध्या या उच्च पातळीपासून आतापर्यंत तो सुमारे 11 टक्क्यांनी घसरला आहे. पण जून तिमाहीचे उत्कृष्ट निकाल असूनही, त्यात आणखी घसरण होऊ शकते असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

त्यामुळेच ब्रोकरेजने रेटिंगसह त्याच्या टारगेटमध्ये कपात केली आहे. सध्या हा शेअर बीएसईवर 1160 रुपयांवर ट्रेड करत आहे.

कार्बोरंडम युनिव्हर्सलचे शेअर 14 ऑगस्ट 2003 रोजी अवघ्या 7.96 रुपयांना होते. पण आता ते 1160 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदार केवळ 69 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने 20 वर्षांत कोट्यधीश झाले आहेत.

या वर्षी हा शेअर 33 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2022 रोजी तो 765.60 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत तो जवळपास 70 टक्क्यांनी वाढून 1300 रुपयांवर पोहोचला. पण या तेजीला आता ब्रेक लागला आणि या उच्चांकापासून तो आतापर्यंत सुमारे 11 टक्क्यांनी खाली आला आहे.

Multibagger Stock Update
Gautam Adani: ...यामुळे गौतम अदानी Adani Wilmar मधील 44% टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत

ऑटो, ऍग्रो प्रोसेसिंग, टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये घरांची मागणी आणि एसएमए औद्योगिक क्लस्टर्समधील रिकव्हरी यामुळे ऍब्रेसिव्ह व्यवसाय आणखी वाढेल असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजला वाटत आहे.

पण येत्या काळात, युरोपमधील कमजोरी आणि चीनकडून वाढत्या पुरवठ्याची आव्हाने कायम आहेत, ज्यामुळे त्याच्या व्हॉल्यूम वाढीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे ब्रोकरेजने त्याचे रेटिंग होल्ड करत टारगेट प्राईस 1,318 रुपयांवरून 1,300 रुपये केली आहे.

Multibagger Stock Update
Made in India: मोदी सरकारचा मोठा निर्णय! गुगलशी स्पर्धा करण्यासाठी उभारणार 'आत्मनिर्भर' वेब ब्राउझर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com