Multibagger Stock Update: 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना 6 महिन्यात दिला दुप्पट परतावा, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहेत.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Stock Market Update: शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहेत. अशावेळी शेअर्सच्या किंमती अतिशय चढ्या असतात, पण तुम्हाला शेअर बाजारात यावेळी पैसे गुंतवायचे असतील तर एक्सपर्ट्सची मदत घेणं फायद्याचे ठरु शकते.

अशात मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक आणला आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या शेअरचा विचार करु शकता. या शेअरमध्ये लाँग टर्मसाठी पैसे गुंतवता येतील असा सल्लाही मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी दिला आहे.

संदीप जैन यांनी तुमच्यासाठी रिफेक्स इंडस्ट्रीज (Refex Industries) या शेअरची निवड केली आहे. ही कंपनी रेफ्रिजरेटरमध्ये गॅस रिफील करण्याचे काम करते.

ही कंपनी पर्यावरणाचा विचार करुन गॅसची निर्मिती करते. या शेअरमध्ये येत्या काळात चांगला परतावा मिळू शकतो त्यामुळे आता या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला जैन यांनी दिला आहे.

रिफेक्स इंडस्ट्रीज (Refex Industries)

करंट मार्केट प्राईस (CMP) - 533 रुपये

टारगेट प्राईस (Target Price) - 570 रुपये

कालावधी (Duration) - 5-6 महीने

Share Market Today
Multibagger Stock Update : तीन वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी, रॉकेटच्या वेगाने वाढतोय 'हा' शेअर

या शेअरमध्ये खरेदी का करावी?

गेल्या अनेक तिमाहींपासून प्रमोटर्सने या कंपनीत आपला हिस्सा वाढवल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत.

सध्या हा स्टॉक 9-10 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. याशिवाय कंपनीचा इक्विटीवर परतावा 46 टक्के आहे. याशिवाय गेल्या 3 वर्षांपासून नफ्यात 46-47 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, विक्री वाढ 65 टक्के आहे.

तिमाही निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने मार्च 2022 मध्ये 24 कोटी रुपयांचा नफा कमावला होता आणि मार्च 2023 मध्ये कंपनीने 51 कोटी रुपयांचा नफा कमावला. कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा 33-34 टक्क्यांवरून 52 टक्क्यांवर पोहोचला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Today
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.