Nifty 50, Sensex suffer biggest single-day loss since June 2022; investors lose over rs 4 lakh crore
Nifty 50, Sensex suffer biggest single-day loss since June 2022; investors lose over rs 4 lakh crore Sakal

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद, सेन्सेक्स-निफ्टी 2 टक्क्यांनी घसरले

Share Market Closing: बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरून 71,500 वर आला. निफ्टीही 460 अंकांच्या घसरणीसह 21,571 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि मेटल क्षेत्रात झाली.
Published on

Share Market Closing Latest Update 17 January 2024: बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,628 अंकांनी घसरून 71,500 वर आला. निफ्टीही 460 अंकांच्या घसरणीसह 21,571 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि मेटल क्षेत्रात झाली. बँक निफ्टी निर्देशांक 4.25 टक्क्यांनी घसरला, एचडीएफसी बँकेचे शेअर्स सर्वाधिक 8 टक्क्यांनी घसरले. तर आयटी क्षेत्रात खरेदी झाली.

सकाळपासून घसरणीचे संकेत

आज सकाळपासून BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीचे संकेत देत होते. दोघांची सुरुवात प्रत्येकी एक टक्क्यांच्या घसरणीने झाली. व्यवहाराच्या शेवटापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीचे नुकसान 2.25 टक्क्यांवर पोहोचले, जी देशांतर्गत शेअर बाजारातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

गेल्या 16 महिन्यांतील सर्वात मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचा सेन्सेक्स 72000 च्या खाली बंद झाला आहे. बुधवारी निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक या सर्व निर्देशांकांत घसरण झाली तर निफ्टी आयटी निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. बुधवारच्या व्यवहारात एचसीएल टेक, एसबीआय लाइफ, टीसीएस आणि एलटीआय माइंडट्रीचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

Nifty 50, Sensex suffer biggest single-day loss since June 2022; investors lose over rs 4 lakh crore
FACT CHECK: रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य

बँकिंग शेअर्समध्ये घसरण

बुधवारी टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँकेसह सर्व बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्स 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर अदानी विल्मर 1.37 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आज बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे HDFC बँकेतील मोठी घसरण. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या HDFC बँकेने 950 अंकांचे योगदान आहे.

Nifty 50, Sensex suffer biggest single-day loss since June 2022; investors lose over rs 4 lakh crore
LIC MCap: एलआयसीने एसबीआयला टाकले मागे; बनली देशातील पहिली सर्वात मौल्यवान पीएसयू कंपनी

आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी, देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com