
एनएसडीएलचा बहुचर्चित आयपीओ 30 जुलैला खुला होणार, प्राइस बँड 760 ते 800 रुपये आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 13 लॉट्ससाठी अर्ज करता येईल.
ग्रे मार्केट प्रीमियम 165-170 रुपये, 6 ऑगस्टला बीएसईवर लिस्टिंग होणार.
NSDL IPO: गुंतवणूकदारांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी एनएसडीएलच्या (National Securities Depository Limited) बहुचर्चित आयपीओची तारीख आणि प्राइस बँड जाहीर झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या डिपॉझिटरीपैकी एक असलेल्या एनएसडीएलचा आयपीओ बुधवारी, 30 जुलै 2025 रोजी खुला होणार आहे. 6 ऑगस्टला बीएसईवर लिस्टिंग होईल. या घोषणेनंतर ग्रे मार्केटमध्ये जोरदार हालचाल दिसून आली आहे.