

NSE Nifty Expiry Day: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या करोडो गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेअर बाजार नियामक SEBIने एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये एक्स्चेंजना मंगळवार किंवा गुरुवार हे दोन दिवस एक्स्पायरीसाठी निवडण्याचा पर्याय दिला होता. यामुळे NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) ने गुरुवारऐवजी सोमवारी एक्स्पायरी ठेवण्याचा घेतलेला निर्णय आता स्थगित होण्याची शक्यता आहे.