NSE IPO: शेअर बाजार चालवणारी कंपनीच आता शेअर बाजारात! 30,000 कोटींचा IPOची तयारी; पैसा कमावण्याची मोठी संधी?

NSE IPO Update: देशातील सर्वात मोठी स्टॉक एक्स्चेंज NSE ने IPO साठी सेबीकडे DRHP दाखल करत शेअर बाजारात उतरण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
NSE IPO Update

NSE IPO Is Coming! India’s Biggest Stock Exchange Prepares for a Massive ₹30,000 Crore Listing

eSakal

Updated on

NSE IPO: देशातील आघाडीची शेअर बाजार संस्था नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) ने आपल्या बहुप्रतीक्षित IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. हा संपूर्ण इश्यू 'ऑफर फॉर सेल' (OFS) स्वरूपातील असून विद्यमान भागधारक आपले शेअर्स विकणार आहेत. या अंतर्गत एकूण 14.89 कोटींहून अधिक शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, न्यू इंडिया अॅश्युरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्ससह अनेक विद्यमान भागधारक या IPO मध्ये आपला हिस्सा विकणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com