Orient Technologies
Orient Technologiessakal

Orient Technologies IPO : आयटी सॉल्यूशन्स देणारी कंपनी आणणार आयपीओ, सेबीकडे पेपर्स दाखल...

ओरिएंट टेक्नॉलॉजीज लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यांनी नुकतेच बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.

ओरिएंट टेक्नॉलॉजीज लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यांनी नुकतेच बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. आयपीओमध्ये 120 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि 46 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) केली जाईल.

ओएफएसमध्ये अजय बळीराम सावंत, उमेश नवनीतलाल शाह, उज्ज्वल अरविंद म्हात्रे आणि जयेश मनहरलाल शाह हे आपले शेअर्स विकणार आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस, ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या ग्राहकांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI), माहिती तंत्रज्ञान (IT) आणि आयटीईएस, आरोग्य आणि फार्मा आणि इतर क्षेत्रातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता.

ओरिएंट टेक्नॉलॉजीज कंपनीचे परिचालन उत्पन्न 2021-22 मध्ये 467.22 कोटीवरून 2022-23 या आर्थिक वर्षात 535.10 कोटी झाले. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 38.30 कोटीपर्यंत वाढला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 33.49 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com