Pakistan Stock Market Crash: आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानसाठी वाईट बातमी आहे. पाकिस्तानला आर्थिक आघाडीवर मोठा धक्का बसू शकतो. जागतिक बँकेने बुधवारी चालू आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानचा विकासदर 2.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. .गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तान डेव्हलपमेंट अपडेट (पीडीयू) मध्ये जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था 2.8 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता तो कमी करण्यात आला आहे. शिवाय, आर्थिक वर्ष 2025साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज आयएमएफने 2.6 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे..जागतिक बँकेच्या अहवालात काय म्हटले आहे?.पाकिस्तानी वेबसाइट डॉननुसार, जागतिक बँकेने म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 26) आर्थिक विकास दर 3.1 टक्के आणि आर्थिक वर्ष 27 मध्ये 3.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.अहवालानुसार, प्रतिकूल हवामान आणि कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे कृषी विकासात किरकोळ घट झाली आहे. कर्जाचे स्तर, धोरण आणि जागतिक व्यापार अनिश्चितता आणि हवामान बदलांच्या धोक्यामुळे जोखीम अजूनही जास्त आहेत..जागतिक बँकेने म्हटले आहे की भविष्यात अर्थव्यवस्था मजबूत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु आर्थिक वाढ मंद राहील. तसेच लोकसंख्या वाढीसह रोजगार निर्मिती आणि गरिबी कमी करणे आव्हानात्मक असणार आहे..TCS on Luxury Goods: करदात्यांना आणखी एक झटका; गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा.पाकिस्तानी शेअर बाजारातही गोंधळ.ब्लूमबर्गच्या मते, पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजार सतत घसरत आहे. आज 24 एप्रिल रोजी पाकिस्तान शेअर बाजार 2,152.12 अंकांनी किंवा 1.84% ने घसरून 114,974.94 वर पोहोचला. काल, बुधवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली..बेंचमार्क केएसई-100 निर्देशांक 1,204 अंकांनी घसरला होता. निर्देशांक 1,204.21 अंकांनी किंवा 1.02 टक्क्यांनी घसरून 117,226.15 वर बंद झाला. म्हणजे फक्त दोन दिवसांत 3,356.12 अंकांची मोठी घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुंतवणूकदारांची अवस्था वाईट आहे. त्यांचे करोडो रुपये बुडाले आहेत..Gold Rate Today: 1 लाखाचा टप्पा गाठल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त.मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून गोळीबार केला. यामुळे सुमारे 28 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात कमी करणे, 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि अटारी पोस्ट बंद करणे यासह अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानला कडक संदेश दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.