Adipurush: 'आदिपुरुष’ गंडल्यामुळे 'या' कंपन्यांचे शेअर्स वनवासात

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची उत्सुकता देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणावर होती.
Adipurush PVR-Inox Stock Drops
Adipurush PVR-Inox Stock DropsSakal

PVR-Inox Stock Drops: 'बाहुबली' सारखा दमदार चित्रपट देणारा अभिनेता प्रभासचा नवा चित्रपट 'आदिपुरुष' बऱ्याच काळानंतर प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची उत्सुकता देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणावर होती.

चित्रपटाची क्रेझ पाहता हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडणार अशी आशाही व्यक्त केली जात होती. पण आत्तापर्यंत आलेले रिव्ह्यू वरुन असे दिसून येत आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकणार नाही.

जितक्या अपेक्षेनं आदिपुरुषकडे पाहिले जात होते. त्या पूर्ण करण्यात दिग्दर्शकाला यश आलेले नाही. यामुळे मल्टिप्लेक्स पीव्हीआर-आयनॉक्सचे शेअर्सही घसरायला लागले आहेत.

प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटात सैफ अली खान आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी आहे. मात्र, एकाच दिवसात PVR च्या शेअरच्या किंमतीत 50 रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून आली आहे.

PVRचे शेअर 3% पेक्षा जास्त घसरले:

आदिपुरुषच्या रिलीजच्या दिवशी, PVR-Inox च्या स्टॉकमध्ये 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 1513.95 रुपयांवर उघडला, तर तो 1450.45 रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे शेअरच्या किंमतीत 3.31 टक्क्यांची घसरण दिसून आली.

पीव्हीआर-आयनॉक्स शेअर्स NSE वर 1509.95 रुपयांवर उघडले आणि 1448 रुपयांवर बंद झाले. येथेही कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 3.39 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही तर पीव्हीआर-आयनॉक्सच्या शेअरमध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. असं असलं तरी, बऱ्याच काळापासून बॉलीवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिस कामगिरी सुमार राहिली आहे.

Adipurush PVR-Inox Stock Drops
500 Notes: छापखान्यांतून 88 हजार कोटींहून अधिक रक्कम गायब, RTI मध्ये धक्कादायक खुलासा

आदिपुरुष हिंदीत 4,000 स्क्रीन्सवर प्रदर्शित:

'आदिपुरुष' हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला तरी तो केवळ हिंदी भाषेत 4,000 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आदिपुरुषकडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या कलेक्शनची अपेक्षा आहे.

मोठी स्टारकास्ट आणि मोठे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात आगाऊ तिकीट बुक करण्यात आले होते.

Adipurush PVR-Inox Stock Drops
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com