
Reliance Industries Q4 Results: नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालांनंतर मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त इक्विटीचा टप्पा पार केला आहे. हा विक्रम करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली कंपनी बनली आहे. यापूर्वी रिलायन्स ही 20 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल (Market Cap) गाठणारी पहिली भारतीय कंपनी ठरली होती.