

Reliance Industries share: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (RIL) शेअर आज बुधवारी बीएसईवरील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तब्बल 2 टक्क्यांनी वाढून 1,468 रुपयांवर पोहोचला. शेअर गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. शेअरने हा टप्पा 1 ऑक्टोबर 2024 नंतर पहिल्यांदाच गाठला आहे.
याआधी 8 जुलै 2024 रोजी या शेअरने 1,608.95 रुपयांवर पोहोचत 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. एप्रिल 2025 मध्ये RIL चा शेअर 1,155.55 रुपयांच्या नीचांकी स्तरावर होता. तिथून पाहता आजपर्यंत त्यात सुमारे 32 टक्क्यांची वाढ झाली आहे.