
SEBI's New UPI Mandate: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. शेअर बाजारातील व्यवहार आता अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील. बाजार नियामक सेबीने व्हॅलिड यूपीआय नावाची एक नवीन पेमेंट सिस्टम सुरू केली आहे, जी 1 ऑक्टोबर 2025 पासून देशभरात लागू केली जाईल.
या सिस्टमद्वारे, गुंतवणूकदार आता फक्त सेबी-नोंदणीकृत ब्रोकर्स, म्युच्युअल फंड, संशोधन विश्लेषक (Research Analyst) किंवा गुंतवणूक सल्लागारांनाच पेमेंट करू शकतील.