Stock MarketSakal
Share Market
Stock Market Closing: शेअर बाजाराने घेतला यू-टर्न; सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?
Stock Market Closing Today: सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 81,207 वर, तर निफ्टी 57 अंकांनी वाढून 24,894 वर बंद झाला. मेटल शेअर्समध्ये खरेदी, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी बाजाराला आधार दिला.
Stock Market Closing Today: आज, 3 ऑक्टोबर रोजी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. बँक निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाला.
सकाळी घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर, दिवसभर बाजार स्थिर राहिले, परंतु शेवटच्या तासात, मेटल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील जोरदार खरेदीमुळे बाजार वाढीसह बंद झाला. मिड- आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही वाढ दिसून आली.

