

Stock Market Opening Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीसह झाली असली, तरी काही क्षणांतच बाजार घसरणीकडे वळला. निफ्टी आणि सेन्सेक्स काही मिनिटांतच लाल रंगात घसरले. सकाळी निफ्टी सुमारे 40 अंकांनी घसरून 25,850च्या आसपास तर सेन्सेक्स 150 अंकांनी खाली होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार दिसत होता.