
Stock Market Opening Today: आज, 3 ऑक्टोबर रोजी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात शेअर बाजारात पुन्हा घसरण दिसून आली. सेन्सेक्स 100 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. निफ्टी देखील 40 अंकांनी घसरला आणि 24,800च्या खाली उघडला. दोन दिवसांपासून वाढणारा बँक निफ्टी देखील आज घसरला.
मेटल, फार्मा आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टीवर टाटा स्टील, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, बीईएल, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील वधारले. तर, आयशर मोटर्स, मॅक्स हेल्थ, ओएनजीसी, कोल इंडिया, एम अँड एम घसरले.