
Stock Market Closing Today: आज भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. निफ्टी सलग पाच दिवसांपासून घसरत आहे. दिवसाच्या व्यवहारादरम्यान निफ्टीने 25,000ची पातळी देखील तोडली. सेन्सेक्स 556 अंकांनी घसरून 81,160 वर बंद झाला. निफ्टी 166 अंकांनी घसरून 24,890 वर बंद झाला. बँक निफ्टी 150 अंकांनी घसरून 55,000 च्या खाली बंद झाला. मेटल शेअर्स आज तेजीत होते. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.