Multibagger Stocks: 293 कोटीच्या ऑर्डरमुळे 'या' शेअर्समध्ये दमदार तेजी, गुंतवणूक करावी का?

Multibagger Stocks: हा शेअर सध्या 877 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Multibagger Stock
Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stocks: शक्ती पंप्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. कंपनीला नुकतीच उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाकडून 10,000 पंपांसाठी 293 कोटींची ऑर्डर मिळाली आहे.

या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. शक्ती पंप्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 11.41% टक्क्यांची वाढ दिसली, हा शेअर सध्या 877 रुपयांवर ट्रेड करत आहे.

वर्क ऑर्डरची एकूण रक्कम जीएसटीसह अंदाजे 293 कोटी आहे. यामध्ये सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा सप्लाय, इंस्टॉलेशन आणि कमीशनिंग समाविष्ट आहे. ऑर्डर 90 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करायची आहे.

शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेड प्रामुख्याने पंप आणि मोटर्सच्या विस्तृत उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. सिंचन, फलोत्पादन, घरगुती पाणीपुरवठा, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन इत्यादींसाठी आधुनिक वॉटर पंपिंग सॉल्यूशंसही देते. या वर्षाच्या सुरुवातीपासून शक्ती पंपचे शेअर्स सुमारे 115% वाढले आहेत.

Multibagger Stock
Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

शक्ती पंप्सची नेट सेल्स जून तिमाहीत 113.06 कोटी होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 254.48 कोटीच्या निव्वळ विक्रीपेक्षा सुमारे 55.57 टक्के कमी आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा 88.6 टक्के कमी आहे.

Multibagger Stock
बहुमालमत्ता गुंतवणूक

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com