Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा, बँक-आयटी शेअर्स तेजीत

Share Market Today: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 1197 अंकांनी वधारून 75418 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 370 अंकांच्या वाढीसह 22968 अंकांवर बंद झाला.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

Share Market Closing Latest Update 23 May 2024: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 1197 अंकांनी वधारून 75418 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 370 अंकांच्या वाढीसह 22968 अंकांवर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीमुळे शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर बाजाराने केला विक्रम

  • आरबीआयच्या विक्रमी लाभांशामुळे बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला

  • निफ्टीने 22,993 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला

  • सेन्सेक्सने 75,499 च्या विक्रमी पातळी गाठली

  • निफ्टी बँक 986 अंकांनी वधारून 48,768 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग शेअर्समधील खरेदी. सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टी बँक निर्देशांक 986 अंकांच्या किंवा 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 48,768 अंकांवर बंद झाला. निफ्टी ऑटोमध्ये 525 अंकांची तर निफ्टी आयटीमध्ये 429 अंकांची वाढ दिसून आली. कंज्यूमर ड्यूरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.

Share Market Today
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7.7 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्सचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले. सन फार्मा, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, कोल इंडिया, एनटीपीसी आणि टाटा कंझ्युमर यांचे शेअर्स घसरले.

Share Market Today
S&P BSE SENSEXSakal

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले?

अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, डिवीज लॅब्स आणि टाटा स्टीलचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. शेअर बाजाराच्या तेजीच्या काळात निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता सर्व निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली.

Share Market Latest Update
Stock Market: लोकसभा निवडणुकीत मोदींना 270 पेक्षा कमी जागा मिळाल्यास शेअर बाजार कोसळणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

निफ्टी बँक निर्देशांक दोन टक्क्यांच्या वाढीसह, निफ्टी ऑटो दोन टक्क्यांहून अधिक आणि निफ्टी आयटी निर्देशांक 1.42 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टीच्या वित्तीय सेवा निर्देशांकातही सुमारे दोन टक्क्यांची वाढ झाली.

निवडणुकीच्या निकालाची चिंता कमी झाली

लोकसभा निवडणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये असलेली अस्वस्थता थोडी कमी झाली असून भाजप सरकारच्या स्पष्ट विजयाची त्यांना आशा आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, "निवडणुकीच्या निकालांबद्दल चिंता होती, पण गेल्या पाच टप्प्यांतील मतदान पाहता, आता 2019 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने निकाल अपेक्षित आहेत.

मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण ही सुरुवातीला चिंतेची बाब होती. ती कमी झाली आहे, यामुळे लोकांमध्ये विद्यमान सरकारच्या पुनरागमनाबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे.'

Share Market Latest Update
RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

केंद्रीय पातळीवर धोरणात सातत्य राहिल्यास बाजाराला दिलासा मिळेल, असे विश्लेषकांनी सांगितले. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के.विजयकुमार म्हणाले, "निफ्टीने नवा विक्रम प्रस्थापित केल्याने असे दिसून येते की, निवडणुकीनंतरही राजकीय स्थैर्य कायम राहण्याची बाजाराला अपेक्षा आहे. सध्याची तेजीही चांगली आहे कारण त्याचे नेतृत्व लार्जकॅप शेअर्सनी केले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com