Share Market Closing : शेअर बाजारावर मोठे संकट; सलग पाचव्या दिवशी बाजार घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे...

आज शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना पुन्हा फटका बसला आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market Closing 15th March 2023 : या आठवडय़ात सलग तिसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सकाळच्या वेळी जोरदार सुरुवात होऊन आणि दुपारपर्यंत तेजीत व्यवहार होऊनही बाजाराने आपला वेग कायम राखला नाही.

गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय बाजार पुन्हा घसरणीसह बंद झाला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 338 अंकांनी घसरून 57,553 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 74 अंकांनी घसरून 16,972 अंकांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान :

आज शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना पुन्हा फटका बसला आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 255.76 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मंगळवारी 256.53 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 77,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कमकुवत जागतिक संकेत हे बाजारातील घसरणीचे कारण होते. कारण ट्रेडिंग सत्राच्या पूर्वार्धापर्यंत बाजार तेजीत होता. पण अमेरिकन बाजार आणि युरोपीय बाजारातील जोरदार विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात वरच्या स्तरावरून घसरण दिसून आली.

आज बाजारातील विक्रीत बँकिंग शेअर्स आघाडीवर होते. याशिवाय ऑटो, आयटीसह रियल्टी शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

आजच्या व्यवहारात दूरसंचार, ऊर्जा, तेल आणि वायू, बँकिंग, वित्तीय सेवा, ऑटो आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. हाच कल मेटल, पॉवर आणि युटिलिटी शेअर्समध्ये होता. ब्रॉड मार्केटमध्ये जवळजवळ सपाट व्यवहार दिसून आला.

BSE India
BSE IndiaSakal
Share Market
TATA Group : गुंतवणूकदार चिंतेत! टाटाच्या 'या' शेअरची 52 आठवड्यांतील सर्वात वाईट कामगिरी, तज्ञ म्हणतात...

आजच्या ट्रेडिंग सत्रात फार्मा, धातू, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, इन्फ्रा, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री झाली आहे.

स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 30 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये तेजी :

आजच्या व्यवहारात एशियन पेंट्स 2.99 टक्के, टाटा स्टील 2.07 टक्के, टायटन कंपनी 1.76 टक्के, लार्सन 1.47 टक्के, पॉवर ग्रिड 1.44 टक्के, कोटक महिंद्रा 1.12 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 108 टक्के शेअर्स तेजीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण :

भारती एअरटेल 2टक्क्यांनी, इंडसइंड बँक 1.85 टक्क्यांनी, रिलायन्स 1.74 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 1.54 टक्क्यांनी, एसबीआय 1.49 टक्क्यांनी, एचयूएल 1.48 टक्क्यांनी घसरले.

Share Market
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com