Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये पाण्यात, 'या' शेअर्सचे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Share Market

Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये पाण्यात, 'या' शेअर्सचे...

Share Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचे ट्रेडिंग सत्र अत्यंत निराशाजनक होते. गुंतवणुकदारांच्या नफा वसुली आणि विक्रीमुळे सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, तर निफ्टी 300 अंकांनी घसरला.

विक्रीच्या तडाख्यातून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. आजच्या व्यवहाराअंती बीएसईचा सेन्सेक्स 60,000 च्या खाली 912 अंकांनी घसरून 59,755 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 275 अंकांनी घसरून 17,550 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहाराच्या सत्रात बाजारातील सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, एनर्जी, इन्फ्रा कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभाग घसरून बंद झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही घसरणीसह बंद झाले. 50 निफ्टी शेअर्सपैकी 46 शेअर्स घसरले तर केवळ 4 शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 2 शेअर्स वाढले तर 28 शेअर्स खाली आले. बँक निफ्टी सर्वात जास्त घसरला आणि हा निर्देशांक 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 39,974 अंकांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान :

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एकाच ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवारी 265.23 लाख कोटी रुपयांवरून 261.34 लाख कोटी रुपयांवर घसरले. म्हणजेच गुंतवणूकदारांचे एकूण 3.91 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.