Share Market Closing: बाजारात 4 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला, काय आहे कारण?

गुरुवारी शेअर बाजारात 4 दिवसांपासून सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे.
Share Market update
Share Market updateSakal

Share Market Closing 8 June 2023: गुरुवारी शेअर बाजारात 4 दिवसांपासून सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. BSE सेन्सेक्स 294 अंकांनी घसरून 62,848 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 91 अंकांनी घसरून 18,634 वर बंद झाला.

बाजारातील घसरणीमध्ये आयटी आणि रियल्टी शेअर्स आघाडीवर होते. बुधवारी देशांतर्गत बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 350 अंकांनी वाढून 63,142 वर बंद झाला.

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएनसीजी, मीडिया, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले.

केवळ ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील शेअर्सना गती मिळाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढले तर 39 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 6 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर सर्वाधिक 2.68 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टीसीएस, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

याशिवाय नेस्ले इंडिया, टायटन, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, भारती एअरटेल, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एशियन पेंट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीचे इंडसइंड बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market update
RBI MPC Meeting: e-RUPI व्हाउचर म्हणजे काय? RBI ने बँक नसलेल्या कंपन्यांना दिली परवानगी, कसा होणार फायदा?

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

एनटीपीसीने सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.62 टक्के वाढ नोंदवली. त्याचप्रमाणे लार्सन अँड टुब्रो आणि पॉवरग्रीडमध्ये अनुक्रमे 1.04 टक्के आणि 0.98 टक्के वाढ झाली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट:

आजच्या व्यवहारात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. BSE मधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 287.51 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे बुधवारच्या 289.07 लाख कोटी रुपयांपेक्षा 1.56 लाख कोटी रुपये कमी आहे. म्हणजेच आजच्या व्यवसायात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.56 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

शेअर बाजारातील घसरणीची कारणे:

  • रिअल इस्टेट, ऑटो, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव आला

  • मेटल आणि ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी

  • किंमतीत कपात झाल्याने सिमेंटचे शेअर्स घसरले

Share Market update
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com