Share Market : या शेअरमध्ये 80 टक्के वाढीचा तज्ज्ञांना विश्वास...

लेमन ट्री हॉटेल्सने नुकत्याच संपलेल्या डिसेंबर तिमाहीसाठी त्यांचे सर्वोत्तम तिमाही निकाल जाहीर केले.
Share Market
Share Market google

मुंबई : लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स कमजोर बाजारातही चांगले परफॉर्म करतील असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट्सना वाटत आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने त्यामुळेच यावर बाय रेटींग कायम ठेवत त्याचे टारगेट 125 रुपयांवरून 132 रुपये केले आहे.

लेमन ट्री हॉटेल्सच्या सध्याच्या किंमतीपेक्षा ही किंमत सुमारे 79.35 टक्क्यांनी जास्त आहे. लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स सध्या 73.75 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. (Share Market: Experts believe 80 percent increase in this share...) हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Share Market
Share Market Today: आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

लेमन ट्रीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्याच्या महसुलात वार्षिक 100 टक्के आणि ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 50 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, जो तो पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

हॉटेल उद्योगासाठी 2023 हे आर्थिक वर्ष कोरोना महामारीनंतर रिकव्हरीचे वर्ष राहिले आहे. आता आर्थिक वर्ष 2024 मध्ये उद्योग स्तरावर मागणीत 10% वाढ होण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेजनुसार ही वाढ 2023 आणि 2027 दरम्यान 4-5% सीएजीआर असू शकते.

कंपनी मार्च 2025 पर्यंत आणखी 2,800 रुम्स जोडण्याच्या विचारात असल्याचे आयसीआयसीआयने सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे एकूण 11,000 रुम्स असतील. कंपनीची त्यांचे कर्ज आर्थिक वर्ष 2025 पासून कमी करण्याची योजना आहे.

Share Market
Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

लेमन ट्री हॉटेल्सने नुकत्याच संपलेल्या डिसेंबर तिमाहीसाठी त्यांचे सर्वोत्तम तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीने 620 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. या कालावधीत त्याचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) 310 कोटी रुपये होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com