
Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या
Share Market Investment Tips : बुधवारी बाजार मजबूत वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स जवळपास 346.37 अंकांनी अर्थात 0.60% वाढून 57,960.09 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 129 अंकांनी म्हणजेच 0.76% वाढून 17,080.70 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
निफ्टीमधील व्यवसायाच्या दृष्टीने बुधवार दिवस ट्रेंडिंग ठरल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. शेवटी 130 अंकांच्या मजबूत नोटवर बंद होण्याआधी बाजार दिवसभर वाढीसह व्यवहार करताना दिसला.
निफ्टीमध्ये सुरुवातीचा रझिस्टंस 17,207 वर दिसत आहे. यानंतर, पुढील रझिस्टंस 17,500 च्या स्तरावर दिसू शकतो. तर निफ्टीमधील महत्त्वाचा सपोर्ट झोन16,940 - 16,910 या स्तरावर दिसत आहे.
तांत्रिकदृष्ट्या 17,050 ची रेंज तोडल्यानंतर त्याला सकारात्मक गती मिळाल्याचे श्रीकांत चौहान म्हणाले. डेली चार्टवर एक आशादायक रिव्हर्सल फॉर्मेशन आणि एक लाँग बुलिश कँडल तयार झाली आहे.
हे फॉर्मेशन सध्याच्या पातळीपेक्षा आणखी वाढ दर्शवत आहे. 17,000 बुल्ससाठी ट्रेंड डिसायडर लेव्हल म्हणून काम करेल. याच्या वर इंडेक्स 17,200-17,250 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17,000 च्या खाली घसरला तर त्याचा अपट्रेंड कमकुवत होईल.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
एचसीएल टेक (HCLTECH)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ट्रेंट (TRENT)
ए यू बँक (AUBANK)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.