Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! 'या' कंपनीच्या शेअरने 6 वर्षात दिला आठपट परतावा

कंपनी टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनेक मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी प्रोजेक्टवर काम करत आहे.
Share Market
Share Market Sakal

Share Market Investment : प्रवेग लिमिटेड (Praveg Ltd) ही शेअर बाजारातील अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे. बनारसचे बहुप्रतिक्षित 'टेंट सिटी वाराणसी' ही कंपनी वाराणसी डेव्हलपेमेंट अथॉरिटीच्या सहकार्याने विकसित करत आहे.

हे टेंट आधारित आधुनिक सुविधा असलेले रिसॉर्ट आहे, जे गंगेच्या काठावर बांधले गेले आहे आणि इथून बनारस घाट, मंदिरे आणि आरतींचे नेत्रदीपक दृश्य दिसते.

प्रवेग लिमिटेडचा शेअर बुधवारी बीएसईवर 3.01 टक्क्यांनी वाढून 460.60 रुपयांवर बंद झाला. पण सुमारे 6 वर्षांपूर्वी, 13 जानेवारी 2017 रोजी त्याची किंमत फक्त 5.46 रुपये होती. अशा प्रकारे गेल्या 6 वर्षात या शेअरची किंमत 8,335.90 टक्क्यांनी वाढली आहे.

म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 6 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 1 लाख रुपयांची किंमत 8,335.90 टक्क्यांनी वाढून सुमारे 84 लाख रुपये झाली असते.

प्रवेग लिमिटेडने एक्झिबिशन मॅनेजमेंट कंपनी म्हणून सुरुवात केली. गेल्या 20 वर्षांत भारतासह जगभरातील 3,000 हून अधिक कार्यक्रम आणि एक्झिबिशन मॅनेज केल्याचा कंपनीचा दावा आहे.

कंपनी सध्या एक्झिबिशन मॅनेजमेंटव्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंट, टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी आणि पब्लिकेशनच्या व्यवसायात आहे.

Share Market
''अमेरिकन उद्योगपती सोरोस याचं विधान म्हणजे भारतीय...'' मोदींवरील टिप्पणीवर भाजपचा संताप

कंपनी टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनेक मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी प्रोजेक्टवर काम करत आहे.

यामध्ये गुजरातच्या कच्छमधील रण उत्सवादरम्यानचे 'व्हाइट रण रिसॉर्ट', 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'जवळील 'टेंट सिटी नर्मदा' आणि अलीकडे बनारस गंगा नदीच्या काठी 'टेंट सिटी वाराणसी' यांचा समावेश आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com