
Share Market Tips : गुंतवणूकदार मालामाल! 'या' कंपनीच्या शेअर्सने गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक
Share Market Tips : फिनोलेक्स केबल्सच्या (Finolex Cables) शेअर्समध्ये बुधवारी जवळपास 6 टक्क्यांनी वाढ झाली. एनएसईवर सध्या हा शेअर 631.05 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, तो इंट्राडेमध्ये 637.70 रुपयांवर पोहोचला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
इतकेच नाही तर गेल्या 6 दिवसांत शेअर जवळपास 17 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत मजबूत निकाल सादर केलेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 18 टक्क्यांनी वाढून 1,150 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ब्रोकरेज फर्म जेफरीजने या शेअरला 710 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार सध्याच्या गुंतवणुकीतून 12 टक्क्यांपर्यंत नफा कमवू शकतात.
कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 42 टक्क्यांनी वाढला असून तो 135 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, ऑपरेटिंग रेव्हेन्यू 37 टक्क्यांनी वाढून 174 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने वायर व्हॉल्यूममध्ये 24 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
तांब्याच्या किमतीतील कमी अस्थिरतेमुळे त्याचे ऑपरेटिंग मार्जिन मागील वर्षाच्या तुलनेत 110 बेसिस पॉइंट्सने 12.3 टक्क्यांनी सुधारले आहे. 10 लाख कोटी रुपयांच्या नियोजित भांडवलासह, 33 टक्क्यांच्या वाढीसह, अधिक गुंतवणूकदार रिअल इस्टेट क्षेत्रात येण्याची शक्यता आहे.
ज्याचा फायदा फिनोलेक्स केबल्सला होईल. कंपनीला इंफ्रास्ट्रक्चर हाऊसिंग सेक्टर, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स, मेट्रो आणि टेलीकम्युनिकेशनमधील (5G) वाढीचा फायदा होण्याची आशा आहे.
हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.