Share Market Today: आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: कमकुवत आशियाई संकेतांमुळे सोमवारी बाजारात अस्थिरता दिसली
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी शेअर बाजार अतिशय अस्थिर वातावरणात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 79.27 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी वाढून 65401.92 वर बंद झाला आणि निफ्टी 6.20 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी वाढून 19434.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत आशियाई संकेतांमुळे सोमवारी बाजारात अस्थिरता दिसली, पण युरोपियन इंडेक्समधील वाढ आणि आयटी शेअर्समधील वाढ यामुळे भारतीय बाजारांमध्ये चांगली सुधारणा झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

पण चीनमधील चलनवाढ आणि मागणीतील मंदी, शिवाय विकसित अर्थव्यवस्थेतील दरवाढीबाबतच्या चिंतेमुळे भारतीय इक्विटी मार्केटमधील उत्साह कमी होत असल्याचे ते म्हणाले.

Share Market Today
Flight Ticket Offer: स्वातंत्र्यदिनी स्वस्तात विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी! स्पाइसजेट देतयं स्पेशल ऑफर

याशिवाय देशांतर्गत बाजारात विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे या महिन्यात गुंतवणूकदारही सावध झाले आहेत. व्यापारी जास्त धोका पत्करण्याचे टाळत आहेत. आता सर्वांच्या नजरा सीपीआयच्या महागाईच्या आकड्यांवर आहेत. रिटेल महागाईचे आकडे खराब राहिल्यास बाजार आणखी खाली येऊ शकतो.

Share Market Today
Adani-Hindenburg case: सेबीने अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली 15 दिवसांची मुदतवाढ

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • इन्फोसिस (INFY)

  • एलटीआय माइंडट्री (LTIM)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • ट्रेंट (TRENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

Share Market Today
Real Estate : रियल इस्टेट एजंटांना व्यवसाय प्रमाणपत्र बंधनकारक

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com