Share Market
Share MarketSakal

Share Market : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! 'या' कंपनीच्या शेअरने गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक, एका महिन्यात...

कंपनीचा शेअर बीएसईवर इंट्राडेमध्ये दमदार तेजीसह 748.35 रुपयांवर पोहोचला आहे.

Share Market Investment Tips : सोनाटा सॉफ्टवेअरचे (Sonata Software) शेअर्स सोमवारी बीएसईवर इंट्राडेमध्ये 10 टक्क्यांच्या दमदार तेजीसह 748.35 रुपयांवर पोहोचले. हा त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

याआधी 16 फेब्रुवारीला 689.95 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. गेल्या एका महिन्यात सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोनाटा सॉफ्टवेअरला डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत मजबूत परिणामांचा फायदा होत आहे. सोनाटा आयटी सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट लायसेसिंग देते.

कंपनी ट्रॅव्हल, रिटेल, कृषी आणि कमोडिटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सॉफ्टवेअर व्हेंडर्सना आयटी सर्व्हिसेस देते. ही कंपनी कर्जमुक्त आहे आणि तिचा रिटर्न रेशो डबल डिजिटमध्ये आहे.

Share Market
Gold-Silver Price : खुशखबर! सोन्याच्या दारात 2,500 रुपयांची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत सोनाटाचा डॉलर महसूल तिमाही आधारावर 4.7 टक्क्यांनी वाढला. दुसरीकडे, रुपयांमधील महसूल तिमाही आधारावर 6.3 टक्के आणि वार्षिक आधारावर 23.9 टक्क्यांनी वाढून 489.6 कोटी रुपये झाला.

त्याच वेळी सोनाटाचा एबिटदा तिमाही आधारावर 70 बीपीएशने घटून 25.2 टक्के झाला, कारण एम्प्लॉयी कॉस्ट आणि मार्केटींग खर्चात वाढ झाली.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा कंसोलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स वार्षिक आधारावर 20 टक्के आणि तिमाही आधारावर 4 टक्क्यांनी वाढून 117.6 कोटीवर पोहोचला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ऍनालिस्ट्सनी सोनाटाला बाय रेटींग दिले आहे. सध्या स्टॉक त्याच्या 725 रुपयांच्या टारगेटपेक्षा जास्त व्यवहार करत आहे. नवीन सीईओने कंपनीचा आयटी सर्व्हिस रेव्हेन्यू चार वर्षांत दुप्पट करण्याची घोषणा केली आहे.

Share Market
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com