Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बाजारात बरीच अस्थिरता दिसून येत आहे.
Share Market
Share Market Sakal

Share Market Investment Tips : शुक्रवारी सलग तीन दिवस सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स 316.94 अंकांनी म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरून 61002.57 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 91.60 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी घसरून 17944.20 च्या पातळीवर बंद झाला.

निफ्टी बँक 500 अंकांनी घसरून 41132 वर बंद झाला. तर मिडकॅप 244 अंकांनी घसरून 30642 वर बंद झाला. कॅपिटल गुड्स वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बाजारात बरीच अस्थिरता दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. बँकिंग, आयटी आणि टेलिकॉम शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफा बुक केला.

चलनवाढ, यूएस बॉण्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्समध्ये वाढ यामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. 17900-17800 वर असलेल्या 20-दिवसांच्या एसएमएवर निफ्टीला सपोर्ट दिसतो.

दुसरीकडे, 50-दिवसांचा एसएमए म्हणजेच 18100-18200 नर निफ्टीसाठी रझिस्टंस दिसत आहे. जर निफ्टी 17800 च्या खाली घसरला तर ही घसरण 17700-17650 पर्यंत जाऊ शकते.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावरही दबाव होता आणि तो सुमारे 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.

सुरुवातीच्या घसरणीनंतर, निफ्टीने एकदा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला पण बँकिंग तसेच आयटीमध्ये सतत विक्री झाल्याने त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळेच निफ्टी 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 17944.20 च्या पातळीवर गेला.

Share Market
Share Market : 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीची शक्यता; बाजार तज्ञांचा अंदाज

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • गोजरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

Share Market
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com