Share Market Investment Tips: कालच्या तेजीनंतर आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या|Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 31 May 2023 before the market opens know details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Investment Tips: कालच्या तेजीनंतर आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: मंगळवारी भारतीय शेअर बाजार अस्थिर वातावरणात तेजीसह बंद झाला. निफ्टी 50 ने मंगळवारी सुमारे 60-70 अंकांची रेंज पाहिली. अशा अस्थिरतेतही त्यात मजबूती दिसली. त्यानंतर बाजार सलग चार दिवसांच्या उच्च पातळीवर बंद झाला.

निफ्टी 18,607 वर उघडला आणि 18,662 चा उच्चांक गाठला. मात्र, इंडेक्सने सकाळीच सगळी वाढ गमावली.

दिवसाच्या 18,576 च्या नीचांकी पातळीपर्यंत दुपारनंतर तो अत्यंत अस्थिर झाला आणि नंतर त्यात वाढ झाली. तो अखेर 35 अंकांनी वाढून 18,634 वर बंद झाला. जो साडेपाच महिन्यांचा नवा उच्चांक आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

इंट्राडे फॉर्मेशन येत्या काळात रेंजबाउंड ऍक्शन सुरू ठेवण्याचे संकेत देत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. 18,665 ही बुल्ससाठी ब्रेकआउट पातळी असेल.

ज्याच्या वर बाजार 18,725-18,750 पर्यंत वाढू शकतो. दुसरीकडे, 18,550 च्या खाली गेल्याने विक्रीचा दबाव वाढेल. त्यामुळे इंडेक्स 18,500-18,475 पर्यंत घसरू शकतो.

बँक निफ्टीही अस्थिर दिसून आल्याचे ते म्हणाले. सेशनच्या उत्तरार्धात तो 44,498.60 च्या नवीन इंट्राडे विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तो अखेर 44,400 च्या वर बंद झाला.

बँक निफ्टी 124 अंकांनी वाढून 44,436 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याने डेली चार्टवर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • आयटीसी (ITC)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ट्रेंट (TRENT)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पीएनबी (PNB)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.