Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

काल शेअर बाजार वाढीसह बंद झाला.
Share Market
Share Market sakal

Share Market Investment Tips: शेअर बाजार सध्या सलग वाढीसह बंद होताना दिसत आहे. निफ्टीने एका दिवसाच्या किरकोळ करेक्शननंतर सुमारे एक टक्क्यांची वाढ नोंदवली. एफओएमसीने फेड फंड्स रेट 25 बीपीएसने वाढवला. सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर इंडेक्स मजबूत झाला. त्याने 18,267.45 चा इंट्राडे उच्चांक गाठला.

बाजाराच्या शेवटी तो 166 अंकांच्या वाढीसह 18,256 वर बंद झाला. जी गेल्या वर्षी 20 डिसेंबरनंतरची सर्वोच्च बंद पातळी आहे. त्याने डेली चार्टवर हायर हाय, हायर लो फॉर्मेशनसह एक लांब बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

लाँग बुल कँडल पॅटर्न कोणत्याही योग्य डाउनसाइड करेक्शनशिवाय बाजारात मजबूत चढ-उताराचा मोमेंटमचे संकेत देत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी म्हणाले. निफ्टी आता 18,200 - 18,300 च्या महत्त्वपूर्ण रझिस्टंस झोनजवळ व्यापार करेल असे ते म्हणाले. येत्या काळात 18,150-18,100 स्तरांवर सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

Share Market
Go First Airlines: गो फर्स्टच्या अडचणीत वाढ, 20 विमानांची नोंदणी रद्द करण्याची केली मागणी, कारण...

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • एचडीएफसी (HDFC)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • एमआरएफ (MRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com