Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

डेली मोमेंटम इंडिकेटरमध्ये पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर आहे, जो तेजीचे संकेत देत आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market : बाजार सोमवारी वाढीसह बंद झाला. निफ्टी 19700 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 529.03 अंकांच्या अर्थात 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 66,589.93 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 147.00 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी वाढून 19711.50 वर बंद झाला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीमध्ये फॉलो-थ्रू खरेदीचा कल दिसून आला आणि तो 147 अंकांनी वाढून बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. डेली चार्टवर, निफ्टी साइडवेज कंसोलिडेशनमधून बाहेर पडला आणि आता एक ट्रेंडिंग मूव्ह दाखवत आहे. डेली मोमेंटम इंडिकेटरमध्ये पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर आहे, जो तेजीचे संकेत देत आहे.

डेली बोलिंजर बँडही विस्तारू लागले आहेत. जे निफ्टीच्या रेंजमध्ये विस्ताराचे संकेत देते. आता बाजारात आणखी तेजी येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वरच्या बाजूला, 19830-19900 जवळ निफ्टीला रझिस्टंस आहे तर 19570-19550 जवळ सपोर्ट दिसत आहे. (Investment)

Share Market
Elon Musks Twitter vs Mark Zuckerbergs Threads : थ्रेड्स घेऊ शकतं का ट्विटरची जागा? पाहा दोन्ही अँपमध्ये काय आहे फरक

आजचे टॉप 10 अ‍ॅक्शन शेअर्स कोणते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

विप्रो (WIPRO)

डॉ. रेड्डी (DRREDDY)

ग्रासिम (GRASIM)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

पीएनबी (PNB)

एम फॅसिस (MPHASIS)

फेडरल बँक (FEDERALBNK)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

व्होल्टास (VOLTAS) (Share Market)

Share Market
Share Market : 72 कोटींच्या ऑर्डरमुळे 'या' शेअरमध्ये दिसतेय मजबूत तेजी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com