Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

निफ्टी बँक 430 अंकांनी घसरून 40702 वर बंद झाली. मिडकॅप 25 अंकांनी वाढून 30667 वर बंद झाला
Share Market
Share Marketesakal

Share Market Opening : सोमवारी बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. बँकिंग, फार्मा आणि ऊर्जा शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. मेटल, पीएसई, रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्सवरही दबाव दिसून आला. तर, मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60692 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 100 अंकांनी घसरून 17845 वर बंद झाला. निफ्टी बँक 430 अंकांनी घसरून 40702 वर बंद झाली. मिडकॅप 25 अंकांनी वाढून 30667 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार लाल चिन्हा बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता, वाढती महागाई याचा परिणाम बाजारावर कायम आहे. तसेच भारतीय बाजारपेठा अजूनही चीनच्या तुलनेत महाग आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आपली होल्डिंग कमी करण्यासाठी या संधीचा फायदा घेत आहेत. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास डेली चार्टवर बियरिश कँडल तयार झाली आहे, जे येत्या काळात बाजारात आणखी घसरण येईल याचे संकेत आहेत. (Stock)

निफ्टी त्याच्या 20-दिवसांच्या एसएमएजवळ ट्रेड करत आहे आणि सेन्सेक्स त्याच्या 60600 च्या सपोर्ट लेव्हलजवळ व्यवहार करत आहे. जर निफ्टी 17900 च्या वर जाण्यात यशस्वी झाला तर पुलबॅक रॅली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अडथळा पार केल्यावर निफ्टी 18000-18125 च्या पातळीला स्पर्श करताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 17800 च्या खाली घसरला तर ही घसरण 17730-17700 पर्यंत जाऊ शकते. (share Maket)

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

सिप्ला (CIPLA)

ब्रिटानिया (BRITANNIA)

बीपीसीएल (BPCL)

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

ऑरोफार्मा (AUROPHARMA)

ए यू बँक (AUBANK)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

ट्रेंट (TRENT)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

Share Market
Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com