SEBI: सेबीचा मोठा निर्णय! शेअर्सची खरेदी विक्री होणार आणखी लवकर; 'या' तारखेपासून T+0 सेटलमेंट होणार लागू

T+0 settlement: सेबी चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी T+0 सेटलमेंटबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही प्रणाली 28 मार्चपासून लागू केली जाऊ शकते. म्हणजे शेअर्स खरेदीच्या दिवशी शेअर्स खात्यात येतील आणि शेअर्स विकल्यानंतर बाजार बंद होताच खात्यात पैसे येतील.
share market t0 settlement to start from march 28 says sebi chairperson madhabi puri buch
share market t0 settlement to start from march 28 says sebi chairperson madhabi puri buch Sakal

T+0 settlement: सेबी चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी T+0 सेटलमेंटबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही प्रणाली 28 मार्चपासून लागू केली जाऊ शकते. म्हणजे शेअर्स खरेदीच्या दिवशी शेअर्स खात्यात येतील आणि शेअर्स विकल्यानंतर बाजार बंद होताच खात्यात पैसे येतील.

पत्रकारांशी संवाद साधताना सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस पर्यायी आधारावर T+0 सेटलमेंट येईल. त्यासाठी त्यांनी 28 मार्च ही संभाव्य तारीख सांगितली आहे.

T+0 सेटलमेंट म्हणजे काय?

T+0 सेटलमेंटमध्ये, T हा व्यवहार (Transaction) मानला जातो. ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले दिवस +1, +2 किंवा +3 असे लिहिलेले आहेत.

T+0 म्हणजे व्यवहार T तारखेला झाला आणि सेटलमेंट +0 दिवसांत पूर्ण झाले. म्हणजे ज्या दिवशी शेअर्सचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात, त्या दिवशी शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात आणि पैसे देखील तुमच्या खात्यात जमा होतात.

share market t0 settlement to start from march 28 says sebi chairperson madhabi puri buch
Adani Group: पुढील 10 वर्षांत अदानी समूह 'या' व्यवसायात करणार 60 हजार कोटींची गुंतवणूक; काय आहे प्लॅन?

T+1 ते T+0 पर्यंतचा प्रवास

27 जानेवारी 2023 रोजी, BSE आणि NSE T+1 सेटलमेंटमध्ये स्थलांतरित झाले. म्हणजे व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पैसे किंवा शेअर्स खात्यात यायचे. चीननंतर, भारत हा जगातील दुसरा देश बनला जिथे T+1 सेटलमेंट सुरू झाली.

T+0 चा फायदा काय आहे?

T+1 वरून T+0 वर स्थलांतरित केल्याने, सेटलमेंट सायकल लहान होणार आहे आणि शेअर्सचे व्यवहार देखील त्वरीत करता येतील. जर एखाद्या कंपनीने बोनस जाहीर केला किंवा लाभांश दिला, तर या सर्व प्रक्रिया तुमच्या खात्यात 1 दिवसानंतर दिसत होत्या, आता त्या त्याच दिवशी बाजार बंद झाल्यानंतर दिसतील.

SEBI ने सांगितले की पहिल्या टप्प्यात, T+0 सेटलमेंट सायकल ट्रेडसाठी दुपारी 1.30 पर्यंत सुरू केली जाईल आणि फंड आणि शेअर्सची सेटलमेंट प्रक्रिया 4.30 पर्यंत पूर्ण केली जाईल. SEBI च्या कन्सल्टंट पेपरनुसार, दुसऱ्या टप्प्यात एक पर्यायी सेटलमेंट पर्याय असेल ज्यामध्ये फंड आणि सिक्युरिटीज दोन्हीचे ट्रेड टू ट्रेड सेटलमेंट केले जाईल.

share market t0 settlement to start from march 28 says sebi chairperson madhabi puri buch
Gold Rate Today: सलग दहाव्या दिवशी सोने झाले महाग; भाव वाढीमागे आहे चीन कनेक्शन

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या या कार्यक्रमातील संभाषणादरम्यान, माधबी पुरी बुच यांनी असेही सांगितले की SME विभागामध्ये काही फेरफार झाल्याची माहिती आहे. माधबी पुरी बुच म्हणाल्या की, सेबी आयपीओच्या किंमतीतील फेरफारावर लक्ष ठेवून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com