Share Market Closing
Share Market ClosingSakal

Share Market Closing: शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद; मार्केट कॅप 404 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर

Share Market Today: शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी वाढ झाली. आरबीआयच्या कारवाईमुळे कोटक बँक 11 टक्क्यांनी घसरला, तर मजबूत निकालांमुळे ॲक्सिस बँकेने 6 टक्क्यांनी उसळी घेतली.

Share Market Closing Latest Update 25 April 2024: शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी वाढ झाली. आरबीआयच्या कारवाईमुळे कोटक बँक 11 टक्क्यांनी घसरला, तर मजबूत निकालांमुळे ॲक्सिस बँकेने 6 टक्क्यांनी उसळी घेतली. सेन्सेक्स 486 अंकांनी वाढून 74,340 वर आणि निफ्टी 168 अंकांनी वाढून 22,570 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर यांसारख्या क्षेत्रांतील शेअर्स वधारत होते तर रिअल इस्टेट आणि कंज्यूमर ड्यूरेबल्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आजही जोरदार वाढ झाली.

निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 50,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
JP Morgan CEO: 'अमेरिकेला मोदींसारख्या नेत्याची गरज', जेपी मॉर्गनचे सीईओ यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक
Share Market Today
Share Market TodaySakal

कोणते शेअर्स वाढले?

आजच्या व्यवहारात ॲक्सिस बँकेचे शेअर्स 6 टक्के, एसबीआय 5.10 टक्के, नेस्ले 2.39 टक्के, एनटीपीसी 2.20 टक्के, आयटीसी 2.02 टक्के, सन फार्मा 1.93 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.48 1.27 टक्के, टाटा स्टीलचे शेअर्स टक्क्यांनी शेअर्स वाढले.

घसरलेल्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये झाली आहे. कोटक बँकेचा शेअर 10.85 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. टायटन 1.05 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर बजाज फायनान्स 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर

शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने ऐतिहासिक उच्चांक गाठला. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 404.09 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 401.47 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ आजच्या व्यवसायात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.62 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Closing
Horlicks: हॉर्लिक्स हेल्थ ड्रिंक श्रेणीतून बाहेर; हिंदुस्तान युनिलिव्हरने का केला बदल?

सेन्सेक्स 700 अंकांनी वर गेला होता

गुरुवारी दिवसभरात शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली वाढ झाली होती. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला होता तर निफ्टी 22,600 अंकांच्या पातळीच्या वर काम करत होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर घातलेल्या बंदीमुळे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये बरीच घसरण झाली होती. परंतु इतर बँकांचे शेअर्स जसे की आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक वाढीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com