Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 73,900 च्या जवळ, कोणत्या क्षेत्रात झाली विक्री?

Share Market Today: बुधवारी सेन्सेक्स 73,876 वर आणि निफ्टी 22,434 वर बंद झाला. सरकारी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला, तर ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव निर्माण झाला.
Share Market Closing
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Closing Latest Update 3 April 2024: बुधवारी सेन्सेक्स 73,876 वर आणि निफ्टी 22,434 वर बंद झाला. सरकारी बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला, तर ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव निर्माण झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बुधवारी, शेअर बाजाराच्या अस्थिर व्यापारात निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकाने 0.5 टक्क्यांची वाढ नोंदवली. BSE स्मॉल कॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढून बंद झाला. निफ्टी आयटी 0.66 टक्क्यांनी वधारला तर निफ्टी बँक देखील किरकोळ वाढीसह बंद झाला.

निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्येही किंचित वाढ झाली. निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण झाली.

Share Market Closing
ITR Forms: करदात्यांसाठी मोठी बातमी; आयकर विभागाने 3 फॉर्म केले जारी, तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य?
Share Market Closing
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स वाढले?

बुधवारी शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया लिमिटेड, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज, कोटक बँक, ब्रिटानिया, सिप्ला आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सचा समावेश होता. श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि डिवीज लॅबचे शेअर्स शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत होते.

Share Market Closing
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

शेअर बाजारातील चढ-उतार दरम्यान, कोचीन शिपयार्ड, पंजाब नॅशनल बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी, लॉरस लॅब्स, नाल्को, अदानी पॉवर आणि लिंडे इंडिया यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

Share Market Closing
RBI Guidelines: EMI भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा! कर्जाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांनी 1.83 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 3 एप्रिल रोजी वाढून 397.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार, 2 एप्रिल रोजी 395.58 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 1.94 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com